Share

Vijay Wadettiwar | भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतोय – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या चिन्ह आणि नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि नावावरून दोन्ही पक्षाच्या दोन्ही गटात वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

The country is not run according to law and constitution – Vijay Wadettiwar 

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरत आहे.

त्यामुळे भाजपमध्ये जे पक्ष सामील होतील पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांनाच मिळेल. यामध्ये कायद्याचा काही संबंध नाही. देश कायदा आणि संविधानाप्रमाणे चाललेला नाही.

देश हुकुमशाहीप्रमाणे चालला आहे. उद्या दोन लोक जरी भारतीय जनता पक्षात सामील झाले तर त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळेल.”

दरम्यान, शिवसेना आमदारांच्या अपात्रेचा निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकर खूप वेळ घेत असल्याचं ठाकरे गटानं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. ते म्हणाले, “मी योग्य प्रश्न विचारताच, बेकायदा मुख्यमंत्र्यांप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी आपला परदेश दौरा रद्द केला.

नार्वेकर जी ह्यांच्या वेळकाढूपणामुळे महाराष्ट्रातील लोकशाहीची हत्या होत असताना ते राष्ट्रकुल संसदीय परिषदेला निघाले होते. हाच मोठा विनोद होता.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात विलंब का होतोय, याचे उत्तर नार्वेकर जी ह्यांनी महाराष्ट्राला आधी द्यावे.

त्यांची निष्क्रियता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या लोकशाहीवर आणि मतदानाच्या शक्तीवर विश्वास असलेल्या प्रत्येकावर अन्याय करणारी आहे.”

महत्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी आणि …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now