Jayant Patil | महाराष्ट्रात जे नेते नकोय, त्यांना दिल्लीत पाठवायची भाजपाची प्रथा – जयंत पाटील

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या एनडीए टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे.

तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष देखील तयारीला लागला आहे. भाजपचे 07 दिग्गज नेते लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या  चर्चा राज्यासह देशाच्या राजकारणात सुरू झाल्या आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली आहे. महाराष्ट्रात जे नेते नको आहे, त्यांना दिल्लीत पाठवायची भाजपची प्रथा असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Will 07 BJP leaders contest in the Lok Sabha elections?

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे 07 दिग्गज नेते मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. यामध्ये गिरीश महाजन, आकाश फुंडकर, राम सातपुते, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, राहुल नार्वेकर आणि संजय केळकर या नावांच्या चर्चा सुरू आहे.

या नेत्यांची मतदारसंघातील लोकप्रियता जातीय समीकरण पाहून आमदारांना खासदारकीसाठी मैदानात उतरवणार असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणावरून जयंत पाटील यांनी भाजपला धारेवर धरलं आहे.

प्रसार माध्यमांशी बोलत असताना जयंत पाटील (Jayant Pati) म्हणाले, “भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात जे नेते नको आहे, त्यांना ते दिल्लीत पाठवतात. महाराष्ट्रात नको असलेल्या नेत्यांना दिल्लीत पाठवायची भाजपची प्रथा आहे. हा त्याचाच एक भाग असू शकतो. त्याच्या पलीकडे याला दुसरं काही महत्त्व नाही.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe