Gulabrao Patil | शिवसेना संजय राऊतांच्या वडिलांनी स्थापन केली का? – गुलाबराव पाटील

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Gulabrao Patil | टीम महाराष्ट्र देशा: 24 ऑक्टोबर 2023 ला दसरा मेळावा पार पडणार आहे. मागच्या वर्षी ठाकरे गट आणि शिंदे गट दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आमने-सामने आले होते.

तर यावर्षी देखील दोन्ही गटामध्ये दसरा मेळाव्यावरून वाद सुरू झाला असल्याचं दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही महानगरपालिकेला अर्ज केला आहे. यावरून संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, “संजय राऊत यांच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली आहे का?

शिवाजी पार्कवर कोण दसरा मेळावा घेईल, हा न्यायालयीन प्रश्न आहे. न्यायालय ज्यांच्या बाजूने निर्णय देईल, तेच शिवाजी पार्क दसरा मेळावा घेतील.”

Did Eknath Shinde’s father establish Shivsena? – Gulabrao Patil

दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. “एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली होती का? शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आहे.

तर उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झालेली आहे. उद्धव ठाकरे यांची खरी शिवसेना आहे. फुटलेला गट म्हणजे खरी शिवसेना नाही.

हातात सत्ता आहे, म्हणून ते काहीही करतील. गेल्या वर्षी शिवसेना मेळावा शिवाजी पार्कला झाला होता, त्याचप्रमाणे यावर्षी देखील होणार”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe