Share

Eknath Shinde | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या रात्रीच्या बैठकीत नेमकं घडलं काय?

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्याच्या राजकीय घडामोडींनी धरला आहे. अशात शनिवारी (30 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एक बैठक पार पडली.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये या बैठकीत तब्बल दोन तास चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर काल (01 ऑक्टोबर) दिवसभर राज्याच्या राजकीय वर्तुळात या बैठकीची चर्चा सुरू होती. अशात या बैठकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याची असल्याची माहिती साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

शिंदे गट आणि भाजपच्या अनेक मंत्र्यांवर दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. तर राज्य शासनात नव्याने सामील झालेल्या मंत्र्याकडे कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

The meeting of Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar lasted for two hours

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे शनिवारी रात्री दहा वाजता मुख्यमंत्री (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली होती.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची ही बैठक तब्बल दोन तास चालली. या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली? याबद्दल राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

महत्वाच्या बातम्या

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्याच्या राजकीय घडामोडींनी धरला आहे. अशात शनिवारी (30 …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now