Ashish Shelar | अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का? आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्रात आणली जाणार आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारला काही सवाल विचारले होते.

भारतात आणली जाणारी वाघ नखं शिवकालीन आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Is Afzal Khan your guest? – Ashish Shelar

ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले? छत्रपतींंच्या वंशजांकडे पुरावे मागणारे आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले?

आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय इथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय?

महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय? आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का? यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात? अहो, पब मधला थरथराट बाहेर असा कोण करतो का? अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?”

दरम्यान, या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” मी बालबुद्धीला उत्तर देत नाही. आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं मला आश्चर्य वाटत नाही. कारण संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागितले होते. पुरावे मागण्याची त्यांची परंपरा आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.