Supriya Sule | राष्ट्रवादी आणि शिवसेनेला तोडून भाजपने महाराष्ट्राचं नुकसान केलं – सुप्रिया सुळे

Supriya Sule | नागपूर: गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप येऊन गेले आहे. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीचा समावेश आहे.

दोघांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली असल्याचं विरोधकांकडून बोललं जातं.

अशात आता या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला तोडून भाजपने महाराष्ट्राचं नुकसान केलं असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Narendra Modi has always opposed familyism – Supriya Sule

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “परिवारवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी विरोध करतात. मात्र, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी शून्यातून पक्ष निर्मिती केली आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वबळावर निर्माण केलेल्या पक्षाला भारतीय जनता पक्षाने तोडण्याचं काम केलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना तोडून भाजपने महाराष्ट्राचे मोठं नुकसान केलं आहे.

दिल्लीतील काही अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात काम करत आहे. त्याचबरोबर हा अदृश्य हात मराठी माणसाचं मोठं नुकसान करताना दिसत आहे.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “शरद पवारांना प्रफुल्ल पटेल (Praful Patel) गेल्या 25 वर्षापासून नेते मानत आहे. ते आठवड्यातून तीन वेळा शरद पवारांना भेटायचे.

मात्र, प्रफुल्ल पटेल यांची पक्षात कशामुळे घुसमट होत होती, हे माहीत नाही. प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळालं आहे.

त्याचबरोबर राष्ट्रवादीला माझ्यामुळे अपयश येत असेल तर मी ते मान्य करते. प्रफुल्ल पटेल यांची घुसमट कधी आमच्या कानापर्यंत आली नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.