Uday Samant | माझ्या दौऱ्याचा खर्च जनतेसमोर जाहीर करेल; उदय सामंतांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Uday Samant | टीम महाराष्ट्र देशा: उद्योग मंत्री उदय सामंत परदेशी दौऱ्यावर जाणार आहे. त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.

आपल्याला निवडून दिलेल्या जनतेची किती काळ थट्टा कराल?, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माझ्यावर टीका करण्यासाठी आणि अजून खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

My best wishes for misleading the public with lies – Uday Samant

ट्विट करत उदय सामंत म्हणाले, “माझा दौरा ठरल्याप्रमाणे निश्चित आहे. मी परत आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या दौऱ्यासाठीचा खर्च कोणी केला हे जनतेसमोर जाहीर करेन किंवा माझ्यावर टीका करणाऱ्या हितचिंतकांनी जाहीर करावे.

त्याआधी २०२२ मध्ये दावोस दौऱ्यासाठीचा तत्कालीन उद्योगमंत्री, पर्यटनमंत्री, ऊर्जामंत्री, प्रधान सचिव मुख्यमंत्री कार्यालय, पर्यटन मंत्र्यांचे खासगी ओएसडी, उद्योगमंत्र्यांचे खासगी सचिव यांचा खर्च एमआयडीसीने केला होता का?

हे देखील पत्रकार परिषद घेऊन किंवा ट्विट करून महाराष्ट्रातील जनतेला सांगावे. माझ्यावर टीका करण्यासाठी आणि अजून खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.”

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर परदेशी दौऱ्यावरून टीका केली होती. ट्विट करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “आपल्या राज्यातील खोके सरकारचे उद्योगमंत्री महोदय काय निर्णय घेणार? जनतेच्या पैश्यांवर रजा घेणार? की दौरा रद्द करणार?

आज गांधी जयंती निमित्ताने, अतिशय नम्रतेने मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हा दौरा रद्द करावा. रजा घ्यायची असेल तर स्वखर्चाने अवश्य घ्यावी, पण जनतेचा पैसा उडवू नका.

• लंडन आणि म्युनिक मधील राऊंड टेबल कॉन्फरन्स ला कोण हजेरी लावणार आहे?

• लंडनमध्ये ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ ची बैठक कोणी आयोजित केली आहे?

• दावोस ला वर्ल्ड इकोनॉमिक फोरम चा कोणीही प्रतिनिधी आत्ता नसताना आणि तिथे काहीच सुरु नसताना, नक्की कसली पहाणी करणार आहात?

आपल्याला निवडून दिलेल्या जनतेची किती काळ थट्टा कराल? महाराष्ट्राच्या जनतेचं तुमच्या दौऱ्यावर लक्ष असेलच! आपल्या सरकारकडे फॉरेन ट्रिप्सवर खर्च करण्यासाठी एवढा पैसा असेल तर, चला चर्चा करूया आपण शेतकऱ्यांच्या मदतीची… आणि जून्या पेन्शन योजनेची!”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.