Aditya Thackeray | आपल्याला निवडून दिलेल्या जनतेची किती काळ थट्टा कराल? आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला खडा सवाल

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील मंत्री सामान्य जनतेच्या पैशावर सहलीला जात असल्याचं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला चांगलं धारेवर धरलं आहे. अशात उद्योग मंत्री उदय सामंत परदेशी दौऱ्यावर जाणार आहे.

त्यांच्या या दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. आपल्याला निवडून दिलेल्या जनतेची किती काळ थट्टा कराल?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

If you want to take leave, you must take it at your own expense – Aditya Thackeray

ट्विट करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “आपल्या राज्यातील खोके सरकारचे उद्योगमंत्री महोदय काय निर्णय घेणार? जनतेच्या पैश्यांवर रजा घेणार? की दौरा रद्द करणार?

आज गांधी जयंती निमित्ताने, अतिशय नम्रतेने मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हा दौरा रद्द करावा. रजा घ्यायची असेल तर स्वखर्चाने अवश्य घ्यावी, पण जनतेचा पैसा उडवू नका.

• लंडन आणि म्युनिक मधील राऊंड टेबल कॉन्फरन्स ला कोण हजेरी लावणार आहे?

• लंडनमध्ये ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ ची बैठक कोणी आयोजित केली आहे?

• दावोस ला वर्ल्ड इकोनॉमिक फोरम चा कोणीही प्रतिनिधी आत्ता नसताना आणि तिथे काहीच सुरु नसताना, नक्की कसली पहाणी करणार आहात?

आपल्याला निवडून दिलेल्या जनतेची किती काळ थट्टा कराल? महाराष्ट्राच्या जनतेचं तुमच्या दौऱ्यावर लक्ष असेलच! आपल्या सरकारकडे फॉरेन ट्रिप्सवर खर्च करण्यासाठी एवढा पैसा असेल तर, चला चर्चा करूया आपण शेतकऱ्यांच्या मदतीची… आणि जून्या पेन्शन योजनेची!

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.