Share

Uddhav Thackeray | ती वाघनखं शिवाजी महाराजांची असतील, तर ती भाड्याने का आणताय? ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीसांना सवाल

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं काही महिन्यांसाठी लंडनमधून महाराष्ट्रात आणली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं शिंदे-फडणवीस यांना धारेवर धरलं आहे.

तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरंच ती वाघनखं शिवाजी महाराजांची असतील, तर मग ती भाड्याने का आणताय? असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.

Shivaji Maharaj is the idol of Maharashtra – Thackeray group

“छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणत असल्याचा गाजावाजा मिंधे-भाजप सरकारनं केलाय. पण ही वाघनखं महाराजांची नसल्याचा दावा आता इतिहास संशोधक संदर्भानिशी करतायत.

शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या संदर्भातील कोणतीही गोष्ट महाराष्ट्रासाठी भूषणावह तसेच पवित्र आहे. पण महाराजांची वाघनखं असल्याचं दाखवून मिंधे-भाजप सरकार काहीही खपवणार असेल आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणार असेल तर ते कदापि खपवून घेतलं जाणार नाही.

ही वाघनखं खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची असतील तर त्याचे तसे रेकॉर्ड लंडनच्या म्युझियममध्ये का नाहीत? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरंच ती वाघनखं शिवाजी महाराजांची असतील, तर मग ती भाड्याने का आणताय?”, असं ठाकरे गटानं ट्विट करत म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून ठाकरे गटासह विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भाजपा शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

ट्विट करत विजय वडेट्टीवार म्हणाले, “शिवरायांचे स्मारक बनवू शकले नाही, ते वाघनखं काय आणणार? वाघनखे आणणे हे मतांच्या राजकारणासाठी भाजपचा नवीन फंडा.”

महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं काही महिन्यांसाठी लंडनमधून महाराष्ट्रात आणली जाणार आहे. या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now