Share

Sambhaji Bhide | संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली तक्रार

🕒 1 min readSambhaji Bhide | पुणे: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख आणि संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अमरावती येथे त्यांच्यावर सर्वात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता संभाजी भिडे यांच्या विरोधात थेट महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी पोलीस … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sambhaji Bhide | पुणे: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख आणि संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यानंतर अमरावती येथे त्यांच्यावर सर्वात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता संभाजी भिडे यांच्या विरोधात थेट महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे.

संभाजी भिडे यांनी केलेलं विधान आक्षेपार्ह आहे. त्यामुळं त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी तुषार गांधी यांनी केली आहे. तुषार गांधी यांच्या या तक्रारीनंतर संभाजी भिडे यांच्या अडचणीत नक्कीच वाढ होणार आहे.

Sambhaji Bhide has satirized the character of Mahatma Gandhi’s mother – Tushar Gandhi

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तुषार गांधी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “संभाजी भिडे यांनी गांधी परिवारावर लांच्छन लावलं आहे.

त्यामुळं मला स्वतःला देखील अत्यंत दुःख झालं आहे. संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या विरुद्ध आम्ही ही तक्रार नोंदवली आहे.

संभाजी भिडे यांनी आतापर्यंत अनेकदा महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. मात्र, आम्ही नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचो. परंतु, आता संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींच्या आईच्या चारित्र्यावर लांच्छन लावलं आहे. भिडे यांनी महात्मा गांधींसोबत महात्मा फुले यांचा देखील अपमान केला आहे. एवढं सगळं होऊन देखील प्रशासन गप्प आहे.”

दरम्यान, संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, “करमचंद गांधी हे महात्मा गांधीजींचे खरे वडील नाही. तर महात्मा गांधीजींचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार आहे.

करमचंद गांधी त्यावेळी एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. करमचंद गांधी एक दिवस त्या मुस्लिम जमीनदाराची मोठी रक्कम घेऊन पळून गेले.

त्यानंतर त्या मुस्लिम जमीनदाराने रागात करमचंद गांधींच्या पत्नीला म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळवून घरी आणले. त्यानंतर त्याने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. म्हणून महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!