Share

Rohit Pawar | “हे आपल्या संस्कृतीला न शोभणारे…”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शहिदांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. शहीद झालेल्या लोकांसाठी माझ्या मनात खूप आदर आहे.

मात्र, शहीद झालेल्यांना कुणी विचारत नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान आपल्या देशाच्या संस्कृतीला शोभत नसल्याचं तर रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, कोणी विचारावे किंवा कोणी मेणबत्त्या लावाव्या म्हणून देशभक्तांनी आपले प्राण त्यागले नाहीत तर अन्यायाविरुद्ध लढण्याची, त्यागाची त्यांची भावना तीव्र होती म्हणून देशभक्तांनी आपले प्राण त्यागले.

शहिदांच्या बलिदानातून सर्वसामान्यांचे रक्त पेटून उठले आणि त्यातूनच अन्यायाविरुद्धचा लढा मजबूत झाला. आपण मोठे नेते आहात, वकील आहात, आपल्याकडे बघून आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते शिकत असतात.

त्यामुळे बोलण्याच्या ओघात अनावधानाने जरी हे वक्तव्य आपल्याकडून झाले असले तरी ते आपल्या देशाच्या संस्कृतीस देखील शोभणारे नक्कीच नाही.”

No one asks the martyrs – Rohit Pawar

दरम्यान, एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी शहिदांनाबत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, “शहीद झालेल्यांना कुणी विचारत नाही. शहीद झालेल्या लोकांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे.

मात्र, काही वर्षानंतर शहिदांना कुणी विचारत नाही. शहीद झाल्याच्या काही वर्षानंतर कुणी त्यांच्यासाठी मेणबत्ती देखील लावत नाही. म्हणून शहीद झालेल्यांबद्दल आदर व्यक्त करत मी म्हणतो की, जेव्हा देशाला गरज असते तेव्हा शहीद व्हायला पाहिजे. परंतु दरवेळी शहीद होऊन चालत नाही. तुम्ही गेममध्ये राहूनच लढू शकतात.”

महत्वाच्या बातम्या

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शहिदांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. शहीद झालेल्या लोकांसाठी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now