Eknath Shinde । काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल गोरेगाव पोलीस ठाण्यात आला होता. याप्रकरणी सर्व तपास यंत्रणा अलर्ट झाली होती. याप्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. (Death Threat to Eknath Shinde)
मुंबई एटीएसने (Mumbai ATS) दोन आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून अटक केली आहे. मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ते दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजाचे रहिवासी आहेत.
मंगेश वायाळ हा ट्रक चालक आहेत तर अभय शिंगणे याचं देऊळगावमध्ये मुख्य रस्त्यावर मोबाईल शॉपी आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेजण संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेशी निगडित असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांना दारूचे व्यसन आहे. त्यांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिली असल्याचे उघड झाले आहे.
हे दोघेही नात्याने मामा आणि भाचे आहेत. या दोघांनी एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी का दिली? याचा शोध तपास यंत्रणेकडून सुरु आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांना यापूर्वी देखील नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली होती.
Death Threat to DCM Eknath Shinde
दरम्यान, मागील काही दिवसांपासून निनावी फोन आणि धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत. परंतु, एकनाथ शिंदे (Eknath Shinde Threate) यांच्या नावाचा उल्लेख केला असल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :