Dhananjay Munde । राजीनाम्याच्या मागणीवरून मंत्री धनंजय मुंडे यांना विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. तसेच सातत्याने याच मुद्द्यावरून महायुती सरकारवर देखील विरोधक टीका करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मुंडेंवर गंभीर आरोप करत राजीनामा मागितला.
यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येत्या 3 मार्चपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget sessions) सुरुवात होणार आहे.
या अधिवेशनामध्ये विरोधक महायुती सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडू शकतात. सभागृहाचे कामकाज बंद पाडून सरकारला बॅकफूटवर पाडू शकतात. यामुळे विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो.
धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. इतकेच नाही तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसोबत धनंजय मुंडे यांचा संबंध असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
Dhananjay Munde resignation before budget session?
विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून महायुती सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडे आपला राजीनामा देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :