Chhagan Bhujbal । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास पवार काका-पुतण्याचा विरोध होता, असे वक्तव्य केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. यावर आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“शरद पवार आणि अजित पवार यांनी काय केले हे माहिती नाही, पण मी असं ऐकलं आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी ज्येष्ठ आणि प्रमुख माणूस त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे. मंत्रिमंडळात अनेक सिनिअर लोक होते, पण त्यावेळी एकनाथ शिंदे हे ज्युनिअर होते,” असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे.
“मी 91 पासून मंत्री आहे. अजित पवार हे देखील 93 पासून मंत्री असून अशा वेळी त्यांनी हे म्हटले हे सर्व सांभाळायचे असेल तर सिनिअर मनुष्य कोणीतरी पाहिजे. हे म्हणाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “मला जर ईव्हीएमचा फायदा झाला असता तर मी निवडणुकीमध्ये दीड ते दोन लाख मतांनी निवडून आलो असतो. 60 हजार मतांनी मी नेहमीच निवडून आलो. यावेळी फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे माझे मताधिक्य कमी झाले आहे,” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एकप्रकारे संजय राऊत यांच्या विधानाला दुजोरा दिला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :