Share

Manikrao Kokate यांचे पद धोक्यात, न्यायालयाकडून 2 वर्षांची शिक्षा; ‘ते’ प्रकरण आलं अंगलट

🕒 1 min readManikrao Kokate । कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी पीक विमा योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. अशातच आता त्यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे तसेच त्यांना ५० हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागणार … Read more

Published On: 

Manikrao Kokate

🕒 1 min read

Manikrao Kokate । कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी पीक विमा योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. अशातच आता त्यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे.

नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे तसेच त्यांना ५० हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागणार आहे. त्यांच्यावर १९९५ मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोप करण्यात आला होता.

माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार कोकाटे यांच्यावर भादवी 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल केला होता. आज याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली.

या सुनावणीदरम्यान न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाउ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यामुळे कोकाटे यांच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाच्या निकालावरून अनेक ठिकाणी कोकाटे यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. परंतु, विरोधक याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची आणि सरकारची कोंडी करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!