Eknath Shinde । अनेकदा राजकीय नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. यामुळे नेत्यांची सुरक्षा देखील वाढवली जाते. अशातच आता राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी दिली असून याबाबतचा गोरेगाव पोलीस ठाण्यात धमकीचा ई-मेल आला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरु असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धमकीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागे कोणाचा हात आहे? याचा कसून तपास सध्या मुंबई गुन्हे शाखेकडून घेण्यात येत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांना यापूर्वी देखील नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली होती. अशातच आता पुन्हा एकदा धमकीचा मेल आल्याने तपास यंत्रणा खडबडून जागी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. याप्रकरणी एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे दिल्ली येथे आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :