Share

Dhananjay Munde यांनी डावलला अजित पवारांचा आदेश, अनेकदा सांगूनही ‘ते’ काम केलेच नाही

It has come to light that Dhananjay Munde has given orders to Ajit Pawar. This has created a lot of excitement in the political circle.

by MHD

Published On: 

Dhananjay Munde ignored the Ajit Pawar instructions

🕒 1 min read

Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय दबाव वाढत असल्याचे बोलले जात आहे.

कालच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी धनंजय मुंडेंवर तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्याशिवाय त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अशातच धनंजय मुंडेंनी अजित पवारांचा आदेश डावलला असल्याची बाब समोर आली आहे. अजित पवार यांनी आपल्या पक्षातील सर्व मंत्र्यांना, आमदारांना आपापल्या मतदारसंघात जनता दरबार घेण्याच्या सूचना केल्या होत्या. यासाठी दिवसही ठरवले होते.

मागील महिन्यातील 7 जानेवारीपासून पक्षाच्या मंत्र्यांच्या पक्ष कार्यालयातील जनता दरबारला सुरवात झाली असून आतापर्यंत जनता दरबाराचे 6 आठवडे होऊन गेले. पण धनंजय मुंडे हे अजूनही एकाही जनता दरबाराला उपस्थित राहिले नाही.

Dhananjay Munde ignored DCM Ajit Pawar instructions

दरम्यान, अजित पवार नेहमीच आपल्या मतदारसंघात जनता दरबार घेत असतात. त्याचप्रमाणे पक्षातील इतर नेते आणि मंत्र्याना देखील जनता दरबार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण अजित पवारांच्या या आदेशाकडे मुंडे यांनी पाठ फिरवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या