Vijay Vadettiwar । कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याचे आता राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार X वर लिहितात, आरोपीचे नाव : माणिकराव कोकाटे
पद: महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री
झालेली शिक्षा: २ वर्ष कारावास, ५०,००० रुपयांचा दंड.
गुन्हा: कागदपत्रांची फेरफार करून आर्थिक फसवणूक .
“शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा! 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला आहे. यात मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, 50 हजार रूपयांचा दंडही कोर्टाकडून ठोठावण्यात आला आहे,” असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
“इतके उद्योगी आणि तेजस्वी लोक महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत की दररोज सरकारची लाज निघत आहे. दररोज आरोप होत आहे, कोर्टाकडून शिक्षेचे आदेश निघत आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आरोपी मंत्र्यांना स्वतः क्लिनचीट देऊन त्यांची पाठराखण करत आहे, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावरून राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहे. राजकीय वर्तुळातून आता कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्य सरकार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यावर काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरते.
न्यायालयाच्या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यापाठोपाठ आता माणिकराव कोकाटे यांनाही विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- कालीचरण महाराजांचा Rahul Gandhi यांच्यावर निशाणा, म्हणाले; “त्यांचे मुंडके छाटून त्याची माळ करा आणि…”
- Rahul Gandhi यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना चुकीचं अभिवादन केलं? काँग्रेसने दिले ‘हे’ उत्तर
- धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या! Anjali Damania यांनी केला ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, नेमकं कारण काय?