Anjali Damania । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने त्यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा राजीनामा मागत आहेत. नुकतीच अंजली दमानिया यांनी पत्रकारपरिषद घेतली होती.
या पत्रकारपरिषदेमध्ये दमानिया यांनी मुंडेंवर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केले आहेत. “हा कृषी घोटाळा (Agricultural Scam) नंबर दोन असून यात धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ज्या विषयाला मंजुरीच मिळालेली नाही त्या विषयावर एक पत्र काढून तब्बल ५०० कोटी रुपये मंजूर करुन घेतले आहेत,” असा मोठा दावा दमानिया यांनी केला.
“धनंजय मुंडे यांचे एक तारीख नसलेले पत्र असून त्यात त्यांनी दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विचारार्थ ठेवलेला विषय मंजूर झाला असे म्हटले आहे. त्या आधारे ११ तारखेला जीआर काढत अतिरिक्त ५०० कोटी रुपये मागण्यात आले आहेत,” असे दमानिया म्हणाल्या आहेत.
“प्रकाश सापळे, स्पायरल ग्रेडर, रासायनिक खते, बॅटरीवर चालणारे पंप, बियाणे प्रक्रिया यंत्र, सोयाबीन स्टोरेज बॅग या वस्तूंसाठी हे पैसे मंजूर केले. पण २३ आणि ३० तारखेच्या कॅबिनेट बैठकीत याचा काही उल्लेख झाला नव्हता. मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आहे, असे दाखवत भ्रष्टाचार केला. असा माणूस मंत्रिमंडळात नाही पाहिजे,” अशीही मागणी दमानिया यांनी केली.
Anjali Damania on Dhananjay Munde
दरम्यान, अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा पत्रकारपरिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दमानिया यांच्या गंभीर आरोपांवर धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :