Share

“राहुलजींच्या ट्विटवर बांगड्या फोडणाऱ्या भाजप भक्तूल्यांनी.. ,” Sushma Andhare यांनी केली राहुल गांधींची पाठराखण

BJP has targeted Rahul Gandhi for his wrong post on Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary. But, Sushma Andhare has supported him.

by MHD

Published On: 

Sushma Andhare targets BJP over Rahul Gandhi Tweet On Chhatrapati Shivaji Maharaj

Sushma Andhare । आज छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) 395 वी जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर (Social media) शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत.

यामध्ये राजकीय आणि सामाजिक सर्व क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. परंतु, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

सत्ताधारी नेत्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका करत माफी मागण्याची मागणी केली आहे. परंतु, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली असून भाजपवरच (BJP) जोरदार निशाणा एक्सवर पोस्ट शेअर करत साधला आहे.

Sushma Andhare post on X

सुषमा अंधारे X वर लिहितात, “शिवराय या आराध्यांच्या संबंधाने आम्ही संवेदनशील आहोत मात्र राहुलजींच्या ट्विटवर बांगड्या फोडणाऱ्या भाजप भक्तूल्यांनी भगतसिंग कोश्यारींवर (Bhagat Singh Koshyari) साधा निंदाजनक ठराव सुद्धा का मांडला नाही किंवा राहुल सोलापूरकरवर (Rahul Solapurkar) कारवाई न करता कुठल्या बिळात लपून बसले होते याची आधी उत्तर द्यावी,” अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

दरम्यान, राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर जयंतीदिनी महाराजांना अभिवादन करण्याऐवजी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी हे ट्विट मागे घेत विरोधकांनी माफीची मागणी केली आहे. विरोधकांच्या मागणीवरून राहुल गांधी माफी मागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही