Vijay Wadettiwar । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीची माहिती समोर येताच विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील त्यांच्यावर टीका केली आहे. “आता धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची ती भेट चार तास झाली, की चार मिनिट झाली. पण भेट झाली हे खर आहे. एकमेकांची पप्पी घेण्यासाठी गेले होते का?”, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
“डोळ्याच ऑपरेशन हे नॉर्मल असतं. काही सिरीयस होते का? त्यावेळेस जाऊन भेटायला मंत्रिमंडळातील कोणीच गेले नाही. हे कशाला भेटायला गेले. कुछ तो गडबड है. काहीतरी साध्य करण्यासाठी धस गेले असतील,” असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
“धस स्वतःचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करत असतील तर ते कोणाच्या इशाऱ्यावर हिम्मत दाखवत आहे हे बावनकुळे यांनी शोधावे. प्रचंड बहुमत असूनही हे सरकार असं का वागत आहे? तीन मुंडीचे सरकार तीन दिशेला का बघत आहे? यांच्या आपसात कुरघोड्या सुरू आहे,” असा आरोप सुरेश धस यांनी केला.
Vijay Wadettiwar on Suresh Dhas
दरम्यान, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप करत टीका केली आहे. या टीकेला सुरेश धस आणि धनंजय मुंडे कशाप्रकारे उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :