Apple । आयफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज Apple चा सर्वात स्वस्त फोन लाँच होणार आहे. कंपनीच्या या फोनमध्ये ग्राहकांना जबरदस्त फीचर्स मिळतील. विशेष म्हणजे आगामी आयफोनला (iPhone) नवीन डिझाईन मिळणार आहे.
आज Apple चा iPhone SE 4 लाँच (iPhone SE 4 Launch Today) केला जाणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की या फोनचे नाव iPhone 16E असेल. कंपनीने घोषणा केल्याप्रमाणे Apple चा हा स्वस्त आयफोन असणार आहे. कंपनी हा स्मार्टफोन(iPhone SE 4 Launch) बर्याच मोठ्या अपग्रेडसह लाँच करू शकते.
हे लक्षात घ्या की Apple च्या अधिकृत वेबसाइट, यूट्यूब चॅनेल आणि अॅपल टीव्ही अॅपवर हा ईव्हेंट लाईव्ह केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ईव्हेंटची लाईव्ह स्ट्रिमिंग भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 11:30 वाजता घरबसल्या पाहता येईल.
iPhone SE 4 Price
किमतीबद्दल बोलायचे झाले तर भारतात iPhone SE 4 हा 50,000 रुपयांना लाँच केला जाऊ शकतो. यूएसएमध्ये हा फोन $500 च्या किंमतीत तर दुबईमध्ये ही किंमत AED 2,000 असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगायचे झाले तर लाँच झाल्यानंतर लगेचच त्याची प्री-ऑर्डर सुरू होईल आणि त्याची विक्री पुढील आठवड्यापर्यंत सुरू होऊ शकेल. पण कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिली नाही.
iPhone SE 4 Special Specifications
iPhone SE 4 मध्ये मोठे डिझाइन बदल पाहायला मिळतील. तो iPhone 14 प्रमाणे नॉच डिझाइनसह येईल. टच आयडीऐवजी कंपनीकडून फेस आयडी प्रदान करण्यात आला आहे, ज्यामुळे फोन अधिक सुरक्षित बनेल. हा फोन AI-आधारित असणार आहे. म्हणजेच यात Apple च्या प्रगत AI टेक्नॉलॉजीचा अनुभव मिळेल.
इतकेच नाही तर यात नवीनतम A18 चिपसेट दिला आहे, जो उत्कृष्ट परफॉर्मन्स प्रदान करेल. SE सीरिजमध्ये पहिल्यांदाच OLED डिस्प्ले पाहायला मिळेल, ज्यामुळे उत्तम व्हिज्युअल अनुभव मिळेल. हा फोन कंपनीच्या 5G मॉडेमसह येऊ शकतो, जो जलद नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
महत्त्वाच्या बातम्या :