Share

डोनाल्ड ट्रम्पचा भारताला झटका, भारतात iPhone फॅक्टरी नको, अमेरिकेतच उत्पादन वाढवण्याचे आदेश

Donald Trump told Apple CEO Tim Cook not to set up iPhone factories in India and suggested to produce only in the US.

Published On: 

Donald Trump told Apple CEO Tim Cook not to set up iPhone factories in India and suggested to produce only in the US.

🕒 1 min read

मुंबई – भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 7 मे रोजी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला होता. यानंतर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत ट्रम्प यांनी मध्यस्थी करत शस्त्रसंधीचा दावा केला होता. आता, त्यांनी Apple कंपनीचे CEO टिम कुक यांना भारतात फॅक्टरी सुरू करू नये, असा सल्ला दिल्याचे वक्तव्य केल्याने नवा वाद उफाळला आहे.

कतारमध्ये झालेल्या एका व्यावसायिक भेटीत ट्रम्प यांनी सांगितले की, “टिम कुक भारतात सर्वत्र फॅक्टरी उभारत आहे. मी त्याला थेट सांगितलं – भारतात मला काही नकोय.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे भारतात iPhone निर्मिती करण्याच्या Apple च्या योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Donald Trump told Apple CEO Tim Cook not to set up iPhone factories in India

सध्या भारतात Foxconn, Tata आणि Pegatron या कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर iPhone चे उत्पादन होत आहे. मार्च 2024 पर्यंत भारतात सुमारे ₹1.83 लाख कोटींचे iPhone तयार झाले असून यामध्ये 60% वाढ नोंदवण्यात आली आहे. Apple ची योजना येत्या काळात भारतातून थेट अमेरिकेला iPhone निर्यात करण्याचीही आहे.

मात्र ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर Apple भारतातील गुंतवणुकीत काही बदल करते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ट्रम्प यांनी याआधी देखील भारत-पाक वादावर प्रतिक्रिया देताना भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मात्र त्यांनी थेट भारतातील उत्पादन धोरणावरच भाष्य केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Mobile India Marathi News Technology

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या