Share

ना गिल ना पंत! ‘या’ सर्वोत्कृष्ट खेळाडूकडे द्या कसोटी कर्णधारपद – सुनील गावसकरांचा सल्ला

Sunil Gavaskar suggests Jasprit Bumrah as India’s next Test captain, saying bowlers understand their workload better and can lead wisely.

Published On: 

Sunil Gavaskar suggests Jasprit Bumrah as India’s next Test captain, saying bowlers understand their workload better and can lead wisely.

मुंबई – आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही कसोटी क्रिकेटपासून निवृत्त झालेले असल्यामुळे संघात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर नवीन कसोटी कर्णधार कोण असावा, यावर चर्चा रंगली आहे. गिल किंवा पंत यांना जबाबदारी द्यावी, अशी चर्चा सुरू असताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी जसप्रीत बुमराह याला कसोटी संघाचे नेतृत्व द्यावे, असा सल्ला दिला आहे.

गावसकर यांच्या मते, गोलंदाजाचा वर्कलोड गोलंदाजालाच चांगल्या प्रकारे समजतो. दुसरा कोणी कर्णधार असला, तर तो बुमराहकडून जास्तीचा खेळ करून घेऊ शकतो. पण बुमराह जर स्वतः कर्णधार असेल, तर तो स्वतःचा वापर योग्य प्रमाणात करेल आणि संघाचाही योग्य वापर करेल, असे गावसकरांचे म्हणणे आहे.

Sunil Gavaskar Wants Jasprit Bumrah as India’s Next Test Captain

गावसकर म्हणाले, “बुमराह हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. त्याला स्वतःच्या मर्यादा आणि क्षमतांचा उत्तम अंदाज आहे. त्यामुळे संघासाठी तो योग्य निर्णय घेईल. कर्णधारपदाचा अनुभवही त्याच्याकडे आहे. त्यामुळे शुभमन गिल किंवा ऋषभ पंत यांच्यापेक्षा बुमराहच अधिक योग्य ठरेल.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही