🕒 1 min read
मुंबई – भारतीय कसोटी संघात मोठे बदल झपाट्याने घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच आर. अश्विनने निवृत्ती घेतली आणि त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या पार्श्वभूमीवर आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघावर आपली पकड मजबूत केली आहे. संघात ‘सुपरस्टार’ कल्चर नको, असा स्पष्ट संदेश देत, गंभीरने खेळाडूंना १० नवीन शिस्तीचे नियम लागू केले आहेत.
गंभीरच्या या नियमांमध्ये देशांतर्गत क्रिकेट अनिवार्य असणे, दौऱ्यादरम्यान वागणुकीच्या पद्धती, माध्यमांशी संवादाचे नियम यांचा समावेश आहे. गंभीरला शिस्तबद्ध आणि तरुण खेळाडूंचा संघ हवा असून, संघातले निर्णय आता कर्णधार नव्हे तर मुख्य प्रशिक्षक घेत असल्याची चर्चा आहे.
Gautam Gambhir Ends Superstar Culture in Team India
रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर गंभीरनेच युवा पिढीला संधी मिळावी यासाठी पुढाकार घेतला. शुभमन गिल कडे कसोटी संघाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र गिलला कर्णधारपदाचा फारसा अनुभव नसल्याने, तो गंभीरच्या मार्गदर्शनात खेळू शकतो. तर जसप्रीत बुमराह हा एकमेव अनुभवी खेळाडू संघात असून तो गंभीरच्या निर्णयांना आव्हान देऊ शकतो.
संघाच्या विजयासाठी गंभीरला पूर्ण स्वातंत्र्य हवे असून, तो आता सर्व निर्णय स्वतःच्या नियमानुसार घेत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. ‘सुपरस्टार’ संस्कृतीऐवजी संघात्मक खेळावर भर देणारी गंभीरची धोरणे भविष्यात संघासाठी कशी परिणामकारक ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बात निकलेगी तो दूर तक जाएगी; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा
- संविधानिक पदावरून अशी भाषा? कर्नल सोफिया कुरेशींवरील वक्तव्याबद्दल CJI गवईंनी भाजप मंत्र्याला सुनावलं
- मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश; नवीन खंडपीठ स्थापन करून जलद सुनावणीचे आदेश