🕒 1 min read
दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यात २६ भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या मोहिमेनंतर आज प्रथमच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी लष्करी छावणीत जवानांना उद्देशून भाषण करत पाकिस्तानला थेट इशारा दिला.
राजनाथ सिंह म्हणाले, “दहशतवाद्यांनी भारताच्या मस्तकावर वार केला, पण आपण त्यांच्या छातीवर प्रहार केला.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, भविष्यात भारतावर झालेला कोणताही दहशतवादी हल्ला हा ‘युद्धाचा भाग’ मानला जाईल.
Rajnath Singh warns Pakistan after Operation Sindoor
सिंह पुढे म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर ही फक्त एक कारवाई नाही, ती आमची दहशतवादविरोधी वचनबद्धता आहे.” त्यांनी जवानांच्या कार्यशक्तीचं आणि त्यांचं शौर्याचं कौतुक करत सांगितलं की, “तुम्ही ज्या पद्धतीने सीमेपलीकडील पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या, ते शत्रू कधीच विसरू शकणार नाही.”
यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या भूमीवरून चालविल्या जाणाऱ्या दहशतवादाचा उल्लेख करत, “बात निकलेगी तो बहुत दूर तक जायेगी,” अशा शब्दांत पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगण्याची ताकीद दिली.
त्यांनी पाकिस्तानला आठवण करून दिली की, २१ वर्षांपूर्वी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमोर पाकिस्तानने वचन दिलं होतं की त्यांच्या भूमीवरून दहशतवाद पसरवला जाणार नाही. पण आजही पाकिस्तान भारताला धोका देत असल्याने याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. भारताच्या जमिनीवर झालेला कोणताही हल्ला हा ‘अॅक्ट ऑफ वॉर’ म्हणून पाहिला जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- संविधानिक पदावरून अशी भाषा? कर्नल सोफिया कुरेशींवरील वक्तव्याबद्दल CJI गवईंनी भाजप मंत्र्याला सुनावलं
- मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश; नवीन खंडपीठ स्थापन करून जलद सुनावणीचे आदेश
- फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानून गावागावात जत्रा भरवावी – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now