🕒 1 min read
मुंबई – भाजपच्या तिरंगा यात्रेवर जोरदार टीका करत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर शरसंधान साधलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना डोनाल्ड ट्रम्प यांना कुलदैवत मानून गावागावात डोनाल्ड यात्रा आणि जत्रा भरवण्याचा सल्ला दिला आहे.
टेंभी नाक्यावर ट्रम्पांचा पुतळा बसवा, अमेरिकेचा झेंडा फडकवा, अशी उपरोधिक मागणी करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. तिरंगा यात्रेचा उद्देश काय? शस्त्रसंधीचं श्रेय का घेताय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Hold Donald Yatra, Install Trump Statue in Maharashtra-
Sanjay Raut
“डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धविराम झाला, मग त्यांच्या विजयाचं जल्लोष करा. डोनाल्ड यात्रा काढा, गावोगावी जत्रा भरवा. अमेरिकेचा झेंडा फडकवा. आणि सांगा की आमचं कुलदैवत आता ट्रम्प आहे,” अशी जहरी टीका त्यांनी फडणवीस, शिंदे आणि नड्डा यांच्यावर केली.
राऊत पुढे म्हणाले की, “युद्धशास्त्र, शस्त्रसंधी समजणं सोपं नाही. हे निवडणूक आयोगाला हातात धरून पक्ष ताब्यात घेण्याइतकं सरळ नाही. बलुचिस्तान भारताकडून मदत मागत होता, तीही दिली नाही, मग विजय कसला?” राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप मंत्री कुंवर विजय शाह यांच्याविरुद्ध स्वतःहून एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “सोफिया कुरेशी यांना पाकिस्तान किंवा आतंकवादी म्हणणं देशद्रोह आहे. अशा व्यक्तीला केवळ पदावरून हटवणं पुरेसं नाही, त्यांना अटक झाली पाहिजे. भाजपनेही त्यांच्या पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- साईबाबांच्या शिर्डीत धक्कादायक घटना, सव्वातीन कोटीचं सोनं घेऊन ड्रायव्हर पसार
- चाकणमध्ये नाईट ड्युटीवर निघालेल्या महिलेवर अत्याचार, आरोपी २४ तासांत अटकेत
- पुणे विमानतळावर १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now