🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड (चाकण) – नाईट ड्युटीवर कामासाठी निघालेल्या २७ वर्षीय महिलेस जबरदस्तीने ओढून निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्री १३ मे रोजी सुमारे ११ वाजता घडली. पोलिसांनी आरोपी प्रकाश भांगरे (रा. मेदनकरवाडी, मूळगाव अकोले, अहमदनगर) याला २४ तासांत अटक केली आहे.
पीडित महिला चाकण एमआयडीसीतील एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करत असून, नाईट शिफ्टसाठी घरातून निघाली होती. खंडोबा मंदिराजवळ आरोपीने तिचा पाठलाग करत रस्ता अडवला आणि जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. या वेळी पीडितेने जोरदार प्रतिकार करत आरोपीला चावाही घेतला, तसेच आरडाओरड केली, मात्र त्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आवाज पोहचला नाही.
Woman on Night Shift Raped in Chakan, Pune
घटनेनंतर पीडित महिला कामावर जाणाऱ्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने थेट चाकण पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फूटेज तपासत आरोपीला शोधून काढले. आरोपी प्रकाश भांगरे याला बेड्या ठोकण्यात आल्या असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुणे विमानतळावर १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
- मोदींना आता कळालं असेल, पाकिस्तानसोबत युद्ध करणं किती महागात पडतं – शाहीद आफ्रिदी
- ‘प्लेयर्स के साथ गंदी बातें करनी चाहिए’, रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल









