मुंबई | टीम इंडियाचा माजी कसोटी कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा सध्या एका व्हायरल मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित म्हणतो की, ‘प्लेयर्स के साथ गंदी बातें करनी चाहिए’.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. मात्र त्याआधी एका विनोदी मुलाखतीमुळे तो चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर रोहितचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
‘Players ke sath gandi baatein karni chahiye’: Rohit Sharma
मुलाखतीदरम्यान रोहित म्हणतो, “खेळाडूंना असं विचारायला हवं की, तुला का खेळवलं नाही? तुला का वगळलं गेलं?” त्यावर मुलाखत घेणारा स्पष्ट करतो की, “अच्छा, म्हणजे तुम्ही संधी न देण्याबद्दल म्हणताय.” त्यावर रोहित हसून म्हणतो, “तुम्ही कायम वेगळाच अर्थ काढता!” ही मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली असून, हा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलाय. रोहितचा 21 मे रोजी दिल्लीविरुद्ध वानखेडेवर सामना होणार असून तो निवृत्तीनंतरचा त्याचा पहिला सामना ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- आधी माफी मागा, मगच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा – अमोल मिटकरी
- आजही शरद पवारांसोबतच आहे, अजित पवार गटात जाण्याचा प्रश्नच नाही – एकनाथ खडसे
- पक्षाचा बाप मंचावर बसलाय, आणि तुम्ही म्हणता मीच खरा; अजित पवार ‘रेम्या’ डोक्याचे – राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












