अमरावती – राज्यात सध्या शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांबरोबरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रिकरणाच्या शक्यतेने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांकडूनही अशी मागणी होताना दिसते.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी या चर्चांवर पाणी फेरलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, “दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याचा विषय आमच्या बैठकीत अजिबात नव्हता.” त्यांनी हेही म्हटलं की, अशा चर्चा पेरल्या जात आहेत आणि त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही.
Amol Mitkari Demands Apology Before NCP Merger Talks Begin
मात्र, त्यांनी एक महत्त्वाचं विधान करत सांगितलं की, “जर एकत्र येण्याची वेळ आलीच, तर आमच्या पक्षाच्या काही अटी-शर्थी असतील. जे लोक अजित पवारांवर खालच्या स्तरावर टीका करत होते, त्यांनी आधी माफी मागावी. त्यानंतरच एकत्र येण्याची चर्चा होईल आणि हे एकत्रिकरण अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच व्हावं, ही आमची अपेक्षा आहे.”
दुसरीकडे, अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी एकत्र येण्याविषयी बोलल्याचं सांगितलं जात होतं. पण अमोल मिटकरी यांनी यावर स्पष्टीकरण देत असं काहीही अजित पवारांनी बैठकीत बोलल्याचं नाकारलं आणि अशा बातम्या पेरणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आधीच म्हटलं होतं की, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा. त्यावर सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया देताना देश सध्या युद्धजन्य परिस्थितीत असल्याने सध्या त्यालाच प्राधान्य देऊ, नंतर एकत्र येण्यावर विचार करू असं सांगितलं.
तसेच, महाविकास आघाडीच्या हालचालींनाही वेग आला आहे. शिवसेना आमदार सचिन अहिर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चांना अधिक उधाण आलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- आजही शरद पवारांसोबतच आहे, अजित पवार गटात जाण्याचा प्रश्नच नाही – एकनाथ खडसे
- पक्षाचा बाप मंचावर बसलाय, आणि तुम्ही म्हणता मीच खरा; अजित पवार ‘रेम्या’ डोक्याचे – राऊत
- राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ; कोणीही पदवी घेऊ शकतो; तर अजित पवार ‘रेम्या’ डोक्याचे – राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












