Share

राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ; कोणीही पदवी घेऊ शकतो; तर अजित पवार ‘रेम्या’ डोक्याचे – राऊत

Sanjay Raut taunts Raj Thackeray saying he is like an open university where anyone can get a degree. He also called Ajit Pawar “remya” for claiming NCP’s legacy.

Published On: 

Sanjay Raut taunts Raj Thackeray saying he is like an open university where anyone can get a degree. He also called Ajit Pawar "remya" for claiming NCP’s legacy.

मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात वेग आला असताना, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे.

संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहेत. कोणताही नेता जाऊन तिथे पदवी घेऊ शकतो. तिथे खिचडी मिळते, पदवीही मिळते. जर राज ठाकरे त्या विद्यापीठाचे कुलगुरू असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र आम्ही केवळ एक अट मांडली होती – महाराष्ट्रद्रोही भूमिका घेणाऱ्यांशी संबंध ठेवू नयेत.”

Sanjay Raut Calls Raj Thackeray an Open University, Taunts Ajit Pawar as ‘Remya’

राऊत यांनी स्पष्ट केलं की, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, परंतु युती करताना “अनैतिक संबंध” ठेवू नयेत, अशी भूमिका ठाकरे गटाची आहे.

नारायण राणे आणि राज ठाकरे यांचं कौतुक करताना राऊत म्हणाले, “या दोघांनी शिवसेना सोडली, स्वतःचा पक्ष स्थापन केला. पण ‘मीच खरा शिवसेनाप्रमुख’ असं त्यांनी कधीही म्हटलं नाही. त्यांनी राजकारण स्वतंत्रपणे केलं.”

अजित पवारांवर टीका करताना राऊत म्हणाले, “तुमच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जन्मदाता बसले असताना, तुम्ही स्वतःलाच राष्ट्रवादीचा निर्माता म्हणता, ही ही भूमिका अजित पवारांना कळत नसेल तर ते रेम्या डोक्याचे आहेत, असे त्यांनी म्हटले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही