मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत, राज्यातील ५८ जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या चार मुख्य विभागांतील जिल्ह्यांमध्ये नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली असून, यामागे पक्ष संघटन अधिक मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला गती देण्याचा उद्देश आहे.
या नव्या नियुक्त्यांमुळे भाजप स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधू शकेल, तसेच बूथ ते मतदारपर्यंत पक्षाची पायाभूत रचना अधिक सशक्त होईल, असा पक्षाचा विश्वास आहे.
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.