Share

भारताची भूमिका ठाम: युद्धविराम होऊनही सिंधू जल करार तात्पुरता स्थगित

Even after a ceasefire, India says the Indus Water Treaty with Pakistan is still suspended due to the Kashmir massacre.

Published On: 

ndia and Pakistan agree to ceasefire from 5 PM today; further DGMO-level talks scheduled for May 12. | Indus Water Treaty

🕒 1 min read

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी युद्धविरामावर सहमती झाली असली तरी, दोन्ही देशांतील अत्यंत महत्त्वाचा सिंधू जल करार ( Indus Water Treaty ) अद्यापही निलंबितच राहणार असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ सूत्राने CNN ला सांगितले आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काही दिवसांतच या 1960 पासून अस्तित्वात असलेल्या करार थांबवण्याचा निर्णय घेतला होता. हा करार दोन्ही देशांमध्ये दीर्घ काळ चाललेला एक यशस्वी राजनयिक करार मानला जात होता.  या सोबतच पाकिस्तानी युट्यूब चॅनल, पाक सोशल मीडिया, पाकिस्तानी न्यूज वेबसाइट भारत सरकारने बंद केल्या होत्या.

यावर संजय राऊत म्हणाले, “27 जवानांचा बळी गेल्यानंतर जर सरकारचं उत्तर एअरस्पेस बंद करणं, युट्यूब चॅनल बॅन करणं, किंवा हाय कमिशनचा स्टाफ कमी करणं असेल, तर ही थेट देशाच्या सुरक्षेशी खेळ करणारी भूमिका आहे. पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद केल्याने बदला घेतला गेला असं म्हणता येईल का? हे हास्यास्पद आहे. राजकीय विरोधकांवर कारवाई करण्यात जेवढा उत्साह असतो, तो पाकिस्तानविरोधात दिसत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

India keeps Indus Water Treaty suspended despite ceasefire with Pakistan

“युद्धविरामाचा या कराराशी काहीही संबंध नाही. युद्धविराम पाकिस्तानकडून आलेली विनंती होती आणि सिंधू जल करार सध्या निलंबितच राहील,” असं भारत सरकारच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचा समावेश असलेली ही जलव्यवस्था उत्तर भारत आणि पाकिस्तानमधील कोट्यवधी लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकते. या संदर्भात पाकिस्तानने इशारा दिला होता की, त्यांच्या पाण्यावर गदा आणणं म्हणजे “युद्धासारखा निर्णय” ठरेल.

दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री यांनी रविवारी Geo News ला दिलेल्या मुलाखतीत जलसंधी, काश्मीर आणि दहशतवाद या मुद्द्यांवर भारतासोबत संवाद क्रमवारीने होईल असं म्हटलं आहे. भारत – पाकिस्तान तणाव वाढत असून, परिस्थिती अजूनही संवेदनशील आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही