🕒 1 min read
Ceasefire Violation – श्रीनगर शहरात आणि नियंत्रण रेषेजवळ शनिवारी संध्याकाळपासून जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आल्यामुळे युद्धविरामाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी रात्री पाकिस्तानवर वारंवार युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
“ भारत-पाकिस्तान सैन्यदल प्रमुखांमध्ये झालेल्या चर्चेनंतर युद्धविरामावर एकमत झाले होते. परंतु काही तासांतच पाकिस्तानकडून उल्लंघन झालं,” असे मिस्री यांनी सांगितले. भारतीय लष्कराला यावर प्रभावी आणि कडक उत्तर देण्याचे आदेश दिले असून, या उल्लंघनांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्यात येत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्यामुळे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून चिंता व्यक्त केली. “युद्धविरामाचं काय झालं? संपूर्ण श्रीनगरमध्ये स्फोट सुरू आहेत!” असं त्यांनी लिहिलं.
Pakistan says they did not break the ceasefire with India
पाकिस्तानकडून मात्र भारताचे आरोप फेटाळण्यात आले आहेत. “आमच्याकडून कोणतेही उल्लंघन झालेले नाही. पाकिस्तानातील जनता भारताविरुद्धच्या विजयाचं जल्लोषात स्वागत करत आहे,” असं पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्ला तारार यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.