Share

भारत-पाकिस्तान शस्त्रविरामावर ट्रम्प यांचा यू-टर्न; म्हणाले, “शस्त्रविराम माझ्यामुळे ..!”

Donald Trump takes U-turn on India-Pakistan ceasefire, says “I didn’t broker it, I just helped reduce tension.”

Published On: 

Donald Trump takes U-turn on India-Pakistan ceasefire, says “I didn’t broker it, I just helped reduce tension.” Narendra Modi

🕒 1 min read

कतार– भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष निवळवण्यात स्वतःच्या भूमिकेचा दावा करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता त्यांच्या वक्तव्यावरून यु-टर्न घेतला आहे. सुरुवातीला ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम झाल्याचे जाहीर केले होते, पण आता त्यांनी “मी शस्त्रविराम घडवून आणला असं नाही म्हणणार” असं म्हणत माघार घेतली आहे.

कतारमधील अमेरिकन लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, “भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यात माझी भूमिका होती, हे मी नक्की म्हणेल. आम्ही दोन्ही देशांशी संवाद साधला आणि त्यांना युद्धाऐवजी व्यापारावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं.”

Donald Trump Backtracks on India-Pakistan Ceasefire Claim

ते पुढे म्हणाले, “मी फक्त सुचवलं की ही समस्या सोडवू शकतो. मी कोणतीही समस्या सोडवू शकतो, फक्त मला सांगा. भारत-पाकिस्तानमध्ये हजारो वर्षांचा संघर्ष आहे. आणखी किती काळ लढत राहणार?”

ट्रम्प यांच्या याआधीच्या विधानानंतर भारताने त्याचा ठामपणे विरोध केला होता. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं की, भारत-पाकिस्तान शस्त्रविरामाचा निर्णय अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे नाही, तर डीजीएमओ स्तरावरील संवादामुळे घेण्यात आला होता. तसेच व्यापारासारख्या कारणांमुळे शस्त्रविराम झाला नाही, असं भारताने स्पष्ट केलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
India Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या