Share

युद्धविराम तोडत पाकिस्तानचा श्रीनगर मध्ये मोठा ड्रोन हल्ला

Just after the ceasefire, a major drone attack hit Srinagar. Citizens report multiple drones across LoC. Explosions heard in the city.

Published On: 

India drone strike | Following Pakistan’s attempted attack after India's Operation Sindoor, India conducted 50 drone strikes across 12 Pakistani cities, destroying Lahore's radar system. The US has advised its citizens to evacuate Pakistan immediately.

🕒 1 min read

युद्धविरामाची घोषणा होताच पाकिस्तानकडून पुन्हा एकदा विश्वासघात झाला आहे. श्रीनगरमध्ये मोठा ड्रोन हल्ला झाल्याचे वृत्त आहे. हवाई संरक्षण यंत्रणेने काही ड्रोन हवेतच उडवले, मात्र एक ड्रोन पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे श्रीनगर परिसरात तीव्र स्फोटाचे आवाज ऐकू आले. पण भारतीय लष्कराने कुठलेही स्फोट झाले नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

घटनेनंतर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत चिंता व्यक्त केली. ”युद्धविरामाचं नेमकं काय झालं? संपूर्ण श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज घुमत आहेत! हे काही युद्धविरामासारखं वाटत नसल्याचे म्हणत त्यांनी पाकिस्तान सरकारवर जोरदार टीका केली आहे. ( What the hell just happened to the ceasefire? Explosions heard across Srinagar! This is no ceasefire. )

Pakistan Drone Attack Hits Srinagar After Ceasefire

नागरिकांच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेवरही अनेक ड्रोन फिरताना दिसले आहेत. श्रीनगर शहरात अचानकपणे आकाशात ड्रोन दिसत आहेत.

संपूर्ण श्रीनगरमध्ये तणावाचं वातावरण आहे. भारताने शांतता राखण्याचा प्रयत्न केला असतानाही पाकिस्तानकडून या प्रकारे डावपेच करत युद्धविरामाची अक्षरशः थट्टा करण्यात आली आहे. भारतीय हवाई दल आणि लष्कर सतर्क असून प्रत्युत्तराची तयारी सुरु झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही