Share

इंदिरा गांधी होना आसान नहीं, युद्धविरामानंतर काँग्रेसचा नरेंद्र मोदी सरकारला टोला

After India’s airstrike under Operation Sindoor, Congress revives memories of Indira Gandhi’s decisive 1971 leadership, indirectly targeting Modi government.

Published On: 

Congress Recalls Indira Gandhi’s Legacy to Subtly Critique Modi Government After Ceasefire"

🕒 1 min read

मुंबई – भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या हवाई कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर करण्यात आला. या कारवाईत भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रीत करत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा करण्यात आला. यानंतर 3 दिवसांनी आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून शांतता प्रस्थापित झाली होती. परंतु युद्धविरामानंतर पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नरेंद्र मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. “इंदिरा होना आसान नहीं” अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया सिनेट यांनी ट्विट करून इंदिरा गांधींच्या 1971 मधील निर्णायक भूमिकेची आठवण करून दिली. काँग्रेसने सोशल मीडियावर इंदिरा गांधींचे जुने व्हिडिओ, फोटोज आणि युद्धावेळचे क्षण पुन्हा समोर आणले आहेत.

Congress Recalls Indira Gandhi’s Legacy to Subtly Critique Modi Government

1971 मध्ये पाकिस्तानच्या दोन भागात फूट पडून बांग्लादेशाची निर्मिती झाली होती. त्या ऐतिहासिक निर्णयामागे इंदिरा गांधींचा धैर्यशील दृष्टिकोन होता. त्या काळात अमेरिकेच्या दबावाखालीही न झुकता इंदिरा गांधींनी थेट अमेरिकेचे सल्लागार हेनरी किसिंजर यांना पाकिस्तानला आवरण्याचा इशारा दिला होता.

काँग्रेसकडून आज पुन्हा त्या क्षणांना उजाळा दिला जात असून, ‘इंदिरा गांधी’ हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या राजकीय वातावरणात काँग्रेसने इंदिरा गांधींच्या ठाम धोरणांद्वारे मोदी सरकारला अप्रत्यक्ष टोला लगवला आहे. कारवाई करून नव्हे तर निर्णायक नेतृत्वाने इतिहास घडतो असेही काँग्रेसने म्हंटले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही