Share

युद्धविरामानंतरही पाकिस्तानचा उन्माद कायम; लष्कर, मंत्री आणि नेत्यांचे भारतविरोधी वक्तव्य

Despite ceasefire, Pakistani leaders and officials continue aggressive rhetoric against India, hailing their military’s actions and slamming Indian media and leadership.

Published On: 

After Ceasefire, Pakistan Leaders Continue Aggressive Rhetoric Against India;

🕒 1 min read

भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धविराम झाल्यानंतरही पाकिस्तानकडून भारतविरोधातील जहाल वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग (PML) च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पाक लष्कराने बंडखोर भारताला गुडघे टेकायला लावले, पाकिस्तान जिंदाबाद!” या ट्विटमुळे पुन्हा एकदा वादाला उधाण आले आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी लष्करी प्रवक्ते जनरल (निवृत्त) आसिफ गफूर यांनी भारतावर जबाबदारीचा अभाव असल्याचा आरोप करत, “भारताने अजूनही एक जबाबदार राष्ट्र कसं असावं हे शिकण्याची गरज आहे. पाकिस्तानने नेहमीच शांततेसाठी प्रयत्नशील भूमिका घेतली आहे,” असे नमूद केले.

After Ceasefire, Pakistan Leaders Continue Aggressive Rhetoric Against India

टॅबडलबचे सहसंस्थापक मोशर्रफ जैदी यांनी अमेरिका आणि उपाध्यक्ष जे.डी. वॅन्स यांचे आभार मानत ट्विटमध्ये दावा केला की, “भारताला प्रतिष्ठेची एक्झिट देण्यासाठी अमेरिका आणि तिच्या नेतृत्वाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.” असे म्हटले आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मंत्री मरियम औरंगजेब यांनी देखील भारताविरोधात टीकेची झोड उठवली. त्यांनी म्हटलं की, “ऑपरेशन बुनियान मर्सूस” च्या माध्यमातून पाकिस्तानने जगाला आपली ताकद दाखवली असून, भारताच्या भ्याड वृत्तीला ठाम उत्तर दिलं. त्या पुढे म्हणाल्या, “भारतीय प्रसारमाध्यमं खोट्या बातम्यांमध्ये अडकली आहेत, तर पाकिस्तानच्या माध्यमांनी जबाबदारीने राष्ट्रीय दृष्टिकोन मांडला आहे.” औरंगजेब हिने शेवटी म्हटलं, “पाकिस्तान शक्तिशाली आहे, अभिमानी आहे. आपल्या लष्कराच्या शौर्यावर संपूर्ण देशाला अभिमान आहे.”

भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि सरफराज अहमद यांनी आपल्या लष्कराच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. वसीम अक्रम यांनी म्हटलं की, “भारताच्या आक्रमकतेला पाकिस्ताननं फक्त उत्तर दिलं आणि हिशेब चुकता केला.” पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद यांनीही पाकिस्तानच्या लष्कराच्या शौर्याचं कौतुक केलं. “आपल्या शूर लष्कराचा अभिमान आहे,” असं ट्विट केले.

भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, युद्धविरामानंतर शांततेचा मार्ग स्वीकारण्याऐवजी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा आक्रमक वक्तव्यांची मालिका सुरू झाली आहे. लष्करप्रमुखांपासून ते मंत्र्यांपर्यंत अनेकांनी भारतावर टिका करत नव्या वादाला पेव फुटवण्याचे काम केले आहे. “भारत गुडघे टेकला”, “जबाबदार राष्ट्र व्हा”, ”भारताला प्रतिष्ठेची एक्झिट” अशा टीका करून तणाव अधिक वाढवत आहेत.

ही भूमिका फक्त शाब्दिक आक्रमकतेपुरती मर्यादित नाही, तर शांततेच्या प्रयत्नांना अपायकारक ठरू शकते. युद्ध टाळायचं असेल तर संयम, परिपक्वता आणि वास्तवाशी जोडलेली भाषा वापरणं आवश्यक आहे. पाकिस्तानकडून आलेली ही राजकीय उत्तेजनात्मक विधाने आगीत तेल ओतणारी असून, त्यांचा त्वरित निषेध होणं गरजेचं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही