Share

मी पुन्हा सांगते…आम्ही अजूनही सतर्क आहोत; पाकिस्तान आर्मीला सज्जड दम!

India confirms ceasefire with Pakistan from 5 PM today, but military remains on high alert; fake news campaign by Pakistan exposed.

Published On: 

India confirms ceasefire with Pakistan from 5 PM today, but military remains on high alert; fake news campaign by Pakistan exposed.

दिल्ली – भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांनी अखेर शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली असून, आज सायंकाळी 5 वाजल्यापासून सर्व प्रकारच्या लष्करी कारवाया थांबवण्यात आल्या आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दुपारी 3:35 वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला फोन केला आणि यानंतर दोन्ही देशांनी जमिनीवर, हवेत आणि समुद्रमार्गाने कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला.

या शस्त्रसंधीची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी भारताने पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे की, भारतीय लष्कर अजूनही सतर्क आहे. यावेळी भारताच्या तीनही सैन्य दलांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. नौदलातर्फे रघू आर नायर, हवाई दलातर्फे विंग कमांडर व्योमिका सिंग आणि लष्करातर्फे कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानच्या फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या मोहिमेवर कठोर भाष्य केलं.

India confirms ceasefire with Pakistan from 5 PM today, but military remains on high alert

कर्नल कुरेशी यांनी स्पष्ट सांगितले की, भारताने कुठल्याही मशिदीवर हल्ला केलेला नाही. पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायांना समर्थन दिलं जात आहे, आणि भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानचे लष्करी नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 7 मे रोजी मोठी एअर स्ट्राईक केली होती, ज्यामध्ये पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.

सोफिया कुरेशी यांनी पाकच्या फेक न्यूजचा बुरखा फाडत सांगितले की, पाकिस्ताननं जेफ -17 नं एस-400 आणि ब्रम्होस मिसाईल बेसला नुकसान पोहोचवलं हे साफ चुकीचं आणि खोटं आहे. पाकनं आणखी एक दावा केला की सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नलिया आणि भूज येथील एअरबेसा नुकसान पोहोचवलं, हा दावा पण चुकीचा होता. चंदीगड आणि बियासमधील अम्युनेशन डंक याचं डॅमेज केल्याचा चुकीचा दावा देखील पाकिस्ताननं केला.

पाकिस्तान पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं भारतीय सैन्यानं मशिदींना नुकसान पोहोचवलं हे देखील चुकीचं आहे. भारत हा निधर्मी देश असल्यचे असल्याचे कर्नल कुरेशी यांनी सांगितले.  शेवटी सोफिया कुरेशी म्हणाल्या, भारतीय सैन्य दल पूर्णपणे तयार आहेत, सतर्क आहेत, भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या रक्षणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही ट्विट करत माहिती दिली की, भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका पूर्वीप्रमाणेच कठोर असून, कुठलीही तडजोड केली जाणार नाही. 12 मे रोजी भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ पुन्हा चर्चा करणार असून, त्यामध्ये पुढील वाटचालीचा निर्णय होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही