Share

भारत-पाकिस्तानमध्ये आजपासून युद्धविराम; 12 मे रोजी महत्त्वपूर्ण चर्चा होणार

India and Pakistan agree to ceasefire from 5 PM today; further DGMO-level talks scheduled for May 12.

Published On: 

ndia and Pakistan agree to ceasefire from 5 PM today; further DGMO-level talks scheduled for May 12. | Indus Water Treaty

🕒 1 min read

दिल्ली | भारत आणि पाकिस्तानमध्ये आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धविराम लागू झाला आहे. परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आज दुपारी 3.15 वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओकडून भारताच्या डीजीएमओला फोन आला आणि त्यानंतर दोन्ही देशांनी सीजफायरसाठी ( Ceasefire ) सहमती दर्शवली.

या निर्णयानुसार, जमीन, हवा आणि समुद्रमार्गांनी कोणतीही लष्करी कारवाई केली जाणार नाही. भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की दहशतवादाच्या विरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही ट्विट करत युद्धविरामाची माहिती दिली. त्यांनी नमूद केले की, भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका पूर्वीप्रमाणेच ठाम राहणार आहे.

India-Pakistan Ceasefire Begins

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच ट्विटरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाबाबत माहिती दिली होती. त्यांच्या ट्विटनंतर भारताकडूनही अधिकृत घोषणा झाली.

12 मे रोजी भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत. या बैठकीत शस्त्रसंधीच्या अटींवर आणि पुढील धोरणावर चर्चा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या चर्चेकडे लागले आहे. ही चर्चा सकारात्मक झाली, तर दोन्ही देशांमधील युद्धजन्य स्थिती कायमची थांबू शकते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या