🕒 1 min read
श्रीनगर | शनिवारी सकाळी श्रीनगरमध्ये झालेल्या जोरदार स्फोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. स्थानिक पत्रकार उमर मेहराज यांच्या म्हणण्यानुसार, हे स्फोट शहरातील दुकाने आणि व्यवसाय सुरू होण्याच्या वेळेस झाले. नागरिकांनी याआधी इतके मोठे स्फोट ऐकले नव्हते, अशी माहिती त्यांनी दिली.
स्फोटांचे आवाज लष्करी ठिकाणांच्या जवळपास ऐकू आल्याने त्या परिसरातील नागरिक अधिक चिंतेत आहेत. “या भागांमध्ये कोणतीही संरक्षण सुविधा जसे की बंकर नाहीत,” अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे.
Loud blasts in Srinagar caused panic among locals
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आजच्या कारवाईबद्दल विधान करत म्हटले, “भारताच्या आक्रमणाला आम्ही सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे आणि निष्पापांच्या रक्ताचा बदला घेतला आहे.” पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करत मिसाईल आणि ड्रोन हल्ले करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि सैन्य, नौदल, वायूदल प्रमुखांसह उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीतील निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारत-पाक तनावाचा फटका: काश्मीरमधील हज उड्डाणे तात्पुरती थांबवली
- पाकिस्तानी फवाद खानवर अभिनेत्रीचा संताप; म्हणाल्या, ‘भारतीय चित्रपटात तू काम केलं, याची लाज वाटते!
- भारतीय हल्ल्यात पाकचे तळ उद्ध्वस्त; पण पाकिस्तानकडून जगासमोर वेगळाच बनाव