🕒 1 min read
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असताना पाकिस्तानवर सडेतोड टीका केली. ऑपरेशन सिंदूरनंतरच्या त्यांच्या या पहिल्या भेटीत त्यांनी श्रीनगरमधील बदामी बाग छावणी येथे जवानांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पाकिस्तानच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीची खिल्ली उडवत म्हटलं की, “पाकिस्तान जिथे उभा राहतो, तिथूनच भिकाऱ्यांची रांग सुरू होते.”
पुढे बोलताना त्यांनी IMF कडून घेतल्या जाणाऱ्या कर्जावरून पाकिस्तानला टोला लगावला. “आज भारत IMF ला कर्ज देतो, तर पाकिस्तान त्यांच्याकडे वारंवार भीक मागतो,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
Queue of Beggars Starts Where Pakistan Stands – Rajnath Singh
त्यांनी जवानांचे अभिनंदन करत सांगितले की, “ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या जवानांनी दाखवलेला शौर्य संपूर्ण देशाला अभिमान वाटण्याजोगा आहे.” याशिवाय, भारत युद्धाचे समर्थक नसल्याचे स्पष्ट करत “सार्वभौमत्वावर हल्ला झाल्यास उत्तर देणे गरजेचे असते,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राजनाथ सिंह यांनी आधुनिक सैनिकी साधनसामुग्री, संरक्षण यंत्रणा, LOC व LACवरील पायाभूत सुविधा यांचा आढावा घेतल्याचेही नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारत-पाकिस्तान शस्त्रविरामावर ट्रम्प यांचा यू-टर्न; म्हणाले, “शस्त्रविराम माझ्यामुळे ..!”
- IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी
- एसटी बसेस होणार ‘स्मार्ट’, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज













