🕒 1 min read
भारत आणि पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर हज समितीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. काश्मीरमधून होणारी सर्व नियोजित हज उड्डाणे १४ मेपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.
हज समितीच्या अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे की, “भाविकांनी संयम बाळगावा आणि पुढील सूचना येईपर्यंत प्रतीक्षा करावी.”
Hajj Flights Suspended in Kashmir
प्रशासनाने हे देखील स्पष्ट केले आहे की, पुढील प्रवासाचे पर्यायी नियोजन किंवा नव्याने वेळापत्रक ठरवले गेले तर त्याची माहिती भाविकांना दिली जाईल. हज यात्रेचा मुख्य कार्यक्रम पुढील महिन्याच्या सुरुवातीस सौदी अरेबियात होणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानी फवाद खानवर अभिनेत्रीचा संताप; म्हणाल्या, ‘भारतीय चित्रपटात तू काम केलं, याची लाज वाटते!
- भारतीय हल्ल्यात पाकचे तळ उद्ध्वस्त; पण पाकिस्तानकडून जगासमोर वेगळाच बनाव
- भारत-पाक संघर्षाच्या छायेत परमाणु धोका वाढतोय – पाक संरक्षण मंत्र्यांची कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now