🕒 1 min read
मुंबई: 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. याच दिवसाचे निमित्त साधून भाजपने याला ‘संविधान हत्या दिन’ म्हणून संबोधत काँग्रेसवर जोरदार टीका केली. मात्र, या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवत, देशात सध्या अघोषित आणीबाणीच सुरू असल्याचा आरोप केला. तसेच, आणीबाणीच्या काळात वर्तमानपत्रे बंद पाडणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचा मुलगा आज भाजपसोबत असल्याचा दाखला देत, अशोक चव्हाणांवरही मिश्किल टोला लगावला.
संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना श्वेता संजीव भट यांचे उदाहरण दिले. “हुकूमशाहीचं मोठं उदाहरण म्हणजे श्वेता संजीव भट आहेत, ज्या गेल्या 7 वर्षांपासून स्वतःच्या पतीसाठी लढत आहेत,” असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.
Sanjay Raut Slams BJP on Emergency
भाजप आणीबाणीला ‘काळा अध्याय’ म्हणत असला तरी, राऊतांच्या मते देशात अनेक ‘काळे अध्याय’ आहेत. त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येचा संदर्भ देत हा एक मोठा काळा अध्याय असल्याचे नमूद केले. याशिवाय, “प्रेसिडंट ट्रम्पच्या दबावाखाली देशाचा पंतप्रधान सरेंडर झाला, यापेक्षा मोठा काळा अध्याय कोणता असेल?” असा सवाल करत त्यांनी मोदी सरकारला घेरले. देशाची लोकशाही इतकी सहजासहजी मरणार नाही, असे ठामपणे सांगत राऊतांनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
आणीबाणी जाहीर करणे हा इंदिरा गांधींना संविधानाने दिलेला अधिकार होता आणि तत्कालीन परिस्थितीनुसार ती देशाची गरज होती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, “गेल्या 11 वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचं काय?” असा सवाल करत त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर बोट ठेवले.
पहलगाम हल्ला आणि पाकिस्तानविरुद्धच्या लढाईवर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरले. “मोदीजी, तुम्ही सरेंडर का झालात?” असा सवाल करत त्यांनी ( Sanjay Raut ) सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आणीबाणीच्या काळात अनेक पत्रकारांवर कारवाई झाली, काहींची वर्तमानपत्रे बंद पडली. यात ‘मार्मिक’चाही समावेश होता, असे राऊतांनी सांगितले. “तेव्हा वर्तमानपत्र बंद पाडणारे शंकरराव चव्हाण यांचा मुलगा आता भाजपला जवळचा झाला आहे. अशोक चव्हाण आता मोदींना प्रिय झाले आहेत,” असे म्हणत त्यांनी ( Sanjay Raut ) भाजप आणि अशोक चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा लोकशाहीचा रोज खून करत असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला. अनिल देशमुख यांच्यासोबतच्या आपल्या कारागृहातील अनुभवाचा संदर्भ देत, “देशासाठी तुरुंगात जाणं चुकीचं नाही, आता आम्हाला पेन्शन द्यावी लागेल,” असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंच्या हिंदी सक्तीविरोधी मोर्चाची तारीख बदलली; आता ५ जुलैला, ठाकरे गटही सोबत येणार?
- दिलजित दोसांजने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत रोमान्स केल्याने नेटकरी तुफान भडकले
- आयसीसीकडून क्रिकेटच्या नियमांत ८ मोठे बदल; २ जुलैपासून अंमलबजावणी, ‘या’ चुकांना ५ धावांचा दंड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











