Share

राज ठाकरेंच्या हिंदी सक्तीविरोधी मोर्चाची तारीख बदलली; आता ५ जुलैला, ठाकरे गटही सोबत येणार?

Raj Thackeray changes protest date to July 5; discusses joint march with Uddhav Thackeray faction.

Published On: 

Operation Sindoor Not the Answer to Terrorism, Says MNS Raj Thackeray Targeting Modi Government

मुंबई: पहिलीच्या वर्गापासून हिंदी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रात तीव्र असंतोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी सकाळी जाहीर केलेला ६ जुलैचा मोर्चा आता एक दिवस आधी, म्हणजेच ५ जुलै रोजी काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या मोर्चासाठी राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय सहभागाचं आवाहन केलं असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत (ठाकरे गट) एकाच मोर्चासाठी चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आज सकाळीच राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलीपासूनच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्तीला विरोध दर्शवला. यासाठी येत्या ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून विराट मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, काही तासांतच या मोर्चाची तारीख बदलून ती ५ जुलै करण्यात आली आहे. यामागे, मराठी भाषेच्या मुद्द्यावर सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा आणि एकच, भव्य मोर्चा काढून सरकारवर दबाव आणण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

Raj Thackeray Changes Protest Date

राज ठाकरे यांनी सकाळी स्पष्ट केले होते की, “हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटलं तर ते (उद्धव ठाकरेंची शिवसेना) पण आलेच. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. आमची माणसं त्यांच्या लोकांशी बोलणार.” कोणत्याही वैचारिक मतभेदांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे ६ जुलैला कळेल, असे सूचक विधानही त्यांनी ( Raj Thackeray ) त्यावेळी केले होते.

या विधानानंतर लगेचच पडद्यामागे घडामोडींना वेग आला. त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीने ७ जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे, ज्याला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा जाहीर केला होता. मनसेने ६ जुलैचा मोर्चा जाहीर केल्याने दोन स्वतंत्र मोर्चांची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता मनसे आणि ठाकरे गट यांच्यासह त्रिभाषा समन्वय समितीकडून दोन ऐवजी एकच मोर्चा काढण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. मनसेच्या नेत्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना एकच मोर्चा काढण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे समजते.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने पहिलीच्या वर्गापासून तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश अनिवार्य करणारे शुद्धिपत्रक जारी केले आहे. अन्य भाषांच्या शिक्षणासाठी अटींचे अडथळे निर्माण करून शिक्षण विभागाने अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती केल्याचा आरोप होत आहे. या निर्णयाविरोधात मराठी भाषाप्रेमी, साहित्यिक आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी यापूर्वीही मराठीच्या मुद्द्यावर अनेक आंदोलने केली आहेत, त्यामुळे हा मुद्दा त्यांनी तातडीने हाती घेतला आहे.

राज ठाकरे यांनी मोर्चाची तारीख बदलून ५ जुलै केल्याने आता सर्वांचे लक्ष ठाकरे गट आणि त्रिभाषा समन्वय समिती यांच्या भूमिकेकडे लागले आहे. मराठी अस्मितेच्या या लढ्यात दोन्ही प्रमुख मराठी पक्ष एकत्र येऊन एकच मोठा मोर्चा काढणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर हे दोन्ही गट एकत्र आले, तर सरकारवर मोठा दबाव निर्माण होऊ शकतो. येत्या काही तासांत यावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, त्याची पुढील दिशा या मोर्चावर अवलंबून असेल.

राज ठाकरेंकडून मोर्चाची तारीख बदलल्याची माहिती

सस्नेह जय महाराष्ट्र,
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी.

आपला नम्र,

राज ठाकरे ।

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही