Share

शिवसेना आक्रमक! ‘रक्त वाहिल्यानंतर आता क्रिकेट खेळता का?’, भारत-पाक सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray slams Modi government over India-Pakistan cricket match, orders protest.

Published On: 

Uddhav Thackeray

मुंबई, ता. १२: आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान ( IND vs PAK ) यांच्यातील क्रिकेट सामन्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळता का?’ असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच, या सामन्याचा निषेध करण्यासाठी १४ तारखेला राज्यभरात आक्रमक आंदोलन करण्याचा आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिला आहे. महिला आघाडीने पंतप्रधानांना सिंदूर पाठवून निषेध नोंदवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Uddhav Thackeray Slams Modi Govt on India-Pak Match

मातोश्रीवर विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारत-पाक सामन्यावरून ( IND vs PAK ) मोदी सरकारवर जोरदार टीका केली. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा बळी गेला होता. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं उघड झाल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळू नये, अशी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा भारत-पाक सामन्याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांनी बैठकीत आगामी निवडणुकांवरही मार्गदर्शन केले. ‘जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू करा. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. स्थानिक पातळीवर आपली ताकद किती आहे, याचा अंदाज घेऊन जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर घ्या’, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, ‘मतदार यादीतील घोळाकडे विशेष लक्ष द्या. वेळीच तक्रारी करून त्यात सुधारणा करा,’ असेही त्यांनी सांगितले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे जनतेसमोर आणा, असे आवाहनही त्यांनी केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही