🕒 1 min read
सातारा – कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणेने पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली असून, एका पोलीस अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ही घटना गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात हलवले जात असताना घडली. साताऱ्याजवळील कणसे ढाब्यावर पोलीस व्हॅन थांबवून कर्मचारी जेवण करत असताना, दोन फॉर्च्यूनर आणि एका थार गाडीतून आलेल्या मारणेच्या समर्थकांनी त्याला पोलीस व्हॅनमध्ये मटण भोजन पुरवले. हा सर्व प्रकार ढाब्यावरील सीसीटीव्हीत कैद झाला.
Gaja Marne’s Highway Mutton Party: 5 Cops Suspended
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरु, हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेतील सहभागी असलेल्या सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल धुमाळ याच्यावर खुनाचा गुन्हा तर पांड्या मोहिते हा गजा मारणेच्या टोळीचा शूटर असल्याचे समोर आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भाजपने 58 जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, वाचा संपूर्ण यादी
- कोल्हापूर काँग्रेसमध्ये खदखद! नगरसेवक नाराज? सतेज पाटील म्हणाले, “चिल्लर…!”
- भारताची भूमिका ठाम: युद्धविराम होऊनही सिंधू जल करार तात्पुरता स्थगित