🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाच्या संघर्षावर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवारांनी स्वत:ला ‘खरा राष्ट्रवादी नेता’ म्हणणं हास्यास्पद असल्याचं सांगत, राऊतांनी त्यांना “रेम्या डोक्याचे” असे संबोधले.
राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदेप्रमाणे अजित पवारांनी स्वत:ला पक्षाचा खरा नेता म्हणण्याचा दावा केला. पण शिंदे कधी म्हणाले नाहीत की मीच बाळासाहेब. मात्र अजित पवार म्हणतात की मीच खरा राष्ट्रवादी. त्याच वेळी, ज्या माणसाने पक्ष स्थापन केला, तोच मंचावर बसलाय, आणि तुम्ही म्हणताय की मी राष्ट्रवादीला जन्म दिला… ही भूमिका जर त्यांना कळत नसेल तर ते रेम्या डोक्याचे आहेत.”
Sanjay Raut Says Ajit Pawar Is ‘Remya’
या विधानामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून, शरद पवार विरुद्ध अजित पवार या संघर्षात आता शिवसेना (ठाकरे गट) उघडपणे शरद पवारांच्या बाजूने उभी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ; कोणीही पदवी घेऊ शकतो; तर अजित पवार ‘रेम्या’ डोक्याचे – राऊत
- गुंड गजा मारणेची ढाब्यावर मटण पार्टी; पाच पोलिस निलंबित
- भाजपने 58 जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, वाचा संपूर्ण यादी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











