Share

“हगवणे, तुला पश्चाताप होतोय का?” – वाचा राजेंद्र हगवणेंचं धक्कादायक उत्तर!

“Don’t you regret what happened?” asked a journalist. Shockingly, Rajendra Hagawane arrogantly dismissed the question, showing no remorse after being arrested in Vaishnavi suicide case.

Published On: 

"Don't you regret what happened?" asked a journalist. Shockingly, Rajendra Hagawane arrogantly dismissed the question, showing no remorse after being arrested in Vaishnavi Hagvane suicide case. - Vaishnavi Hagawane

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटक झालेल्या राजेंद्र हगवणेंची ( Rajendra Hagawane ) पत्रकाराच्या प्रश्नावर दिलेली प्रतिक्रिया सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. “हगवणे, तुला पश्चाताप होतोय का?” असा थेट प्रश्न विचारण्यात आला असताना, हगवणेंनी कोणतीही पश्चात्तापाची भावना व्यक्त न करता उद्दामपणे नकारार्थी इशारा केला. त्यांचं हे वर्तन पाहून उपस्थित पत्रकार व सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

वैष्णवीच्या सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप होत असतानाच राजेंद्र व त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली. अटकेच्या आधी मटणावर ताव मारताना त्यांचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे जनतेचा रोष आणखीनच वाढला होता.

Rajendra Hagawane shows no regret after arrest

राजकीय स्तरावरही मोठा गदारोळ निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने राजेंद्र हगवणेंला पक्षातून निलंबित केलं आहे. सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही