Share

‘वेळेत दिवे लावले असते तर ही वेळ आली नसती’, पुण्यात रुपाली चाकणकरांना घेरलं; चाकणकरांचा काढता पाय

Vaishnavi Hagawane’s suicide case Pune police arrested her father-in-law and brother-in-law. Rupali Chakankar faces strong criticism for delay in taking action. Activists say timely steps could have saved Vaishnavi’s life.

Published On: 

Rupali Chakankar Reacts After Rajendra Hagwane's Arrest in Vaishnavi Hagawane Suicide Case

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या ( Vaishnavi Hagawane Suicide ) प्रकरणात पोलिसांनी सासरा राजेंद्र हगवणेला आणि दीर सुशील हगवणेला अटक केली आहे. सात दिवसांच्या फरारानंतर या दोघांना बावधन पोलिसांनी शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता ताब्यात घेतले. वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा यांनाही आधीच अटक झाली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात वेळेत कारवाई न झाल्याबद्दल सवाल केला. छावा संघटनेचे धनंजय जाधव आणि इतर महिलांनी रुपाली चाकणकर यांच्यावर ताशेरे ओढले, “वेळेत योग्य ती कारवाई झाली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता,” असे म्हटले. रुपाली चाकणकर यांनी आपल्या बाजूने, पोलीस अधिकाऱ्यांना सुमोटो कारवाईसाठी सूचना दिल्या असल्याचा दावा केला.

Vaishnavi Hagawane Suicide Case Pune

वैष्णवीने सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या कुटुंबियांनी तिच्यावर हुंड्यासाठी आणि घरातील कामावर बऱ्याच प्रकारे त्रास दिल्याचा आरोप आहे. पोस्टमार्टममध्ये वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे खुणा होत्या .

या घटनेने पुण्यात मोठा खळबळ उडाली असून, महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांकडून राज्यातील महिला आयोगाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही